⚡ ब्रेकिंग News

धुळोबा यात्रेत भक्तीबरोबर कर्तृत्वाचा गौरव; ‘माणदेश रत्न’ सोहळा रंगणार*

 माणदेश न्यूज 

 धुळदेव प्रतिनिधी

धुळोबा यात्रा धुळदेव

धुळोबा यात्रेत भक्तीबरोबर कर्तृत्वाचा गौरव; ‘माणदेश रत्न’ सोहळा रंगणार*

माण तालुक्यातील धुळदेव येथे श्री धुळोबा देवाच्या यात्रेनिमित्त सुशिक्षित व जागरूक तरुणांच्या पुढाकारातून ‘माणदेश रत्न पुरस्कार वितरण सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा ४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता श्री. धुळोबा मंदिर परिसरात पार पडणार असून, माणदेशातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मानाचा हा एक भव्य उत्सव ठरणार आहे.


या सोहळ्यात माण तालुक्यातील नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक (PSI) अधिकारी, स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेले अधिकारी, इंडियन आर्मी व महाराष्ट्र पोलीस दलातील जवान, तसेच धुळदेव गावातील गुणवंत विद्यार्थी व खेळाडू यांचा गौरव करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत यश संपादन करणाऱ्या तरुणांना प्रेरणा देण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.


कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, त्यामध्ये IRS अधिकारी सचिन मोटे, नितीन वाघमोडे DYSP प्रदीप गोरड, API दत्तात्रय दराडे तसेच प्रसिद्ध वक्ते, कथाकथन व लेखक नागू विरकर आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांचा समावेश आहे. त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असल्याने कार्यक्रमाचे महत्त्व अधिक वाढले आहे.


श्री धुळोबा यात्रेनिमित्त दरवर्षी लाखो भक्त येत असतात, यंदा पहिल्यांदाच पुरस्काराचा उपक्रम राबवल्यामुळे भक्ती व ज्ञानाचा संगम दिसणार आहे. श्री धुळोबा नॉलेज फाउंडेशन यांच्या वतीने आगामी काळात अजूनही उपक्रम राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. धुळदेव गावाने नेहमीच कर्तृत्ववानांची परंपरा जपली असून, या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून त्या परंपरेला नवा उजाळा मिळणार आहे. संपूर्ण माणदेशासाठी हा अभिमानाचा क्षण ठरणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...