⚡ ब्रेकिंग News

रोहित दादा पवार यांची माजी चेअरमन राजेंद्र शिर्के यांनी सदिच्छा भेट घेतली.

सातारा प्रतिनिधी

🚩🌹 कर्मवीरांच्या विचारांना विनम्र अभिवादन…! 🌹🚩

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातारा येथील कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेतील तरुण, तडफदार व अभ्यासू आमदार म्हणून संपूर्ण राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केलेले कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार जनरल बॉडी सदस्य रोहित दादा पवार यांची माजी चेअरमन राजेंद्र शिर्के यांनी सदिच्छा भेट घेतली.

✨ यावेळी रोहित दादा पवार यांना रयत को-ऑप सातारा बँकेच्या मुख्य शाखेत  बोलवून  त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बँकेच्या विविध सोयी-सुविधा, कामे, सभासदांच्या अडीअडचणी तसेच प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

💫 चर्चेदरम्यान सातारा येथील बँकेच्या जागेसंदर्भातील प्रश्न तसेच वाशी येथील शाखेच्या जागेचा विषय रोहित दादा पवार यांच्या निदर्शनास शिर्के सरांनी आणून देण्यात आला.

✅ सातारा येथील जागेची रोहित दादा पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी करून संबंधित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

✅ तसेच वाशी येथील जागेचा प्रश्न सिडकोच्या माध्यमातून सोडवण्यासाठी दि. १६ मे रोजी वाशी येथे बैठक आयोजित करण्यात आली असून, त्या बैठकीसाठी राजेंद्र शिर्के यांना निमंत्रित करण्यात आले आहे. संबंधित प्रश्नावर तात्काळ कार्यवाही करण्याचेही आश्वासन यावेळी देण्यात आले.

🌹माजी चेअरमन राजेंद्र शिर्के यांचा रयत को-ऑप बँकेच्या प्रगतीसाठी, सभासदांच्या हितासाठी  सुरू असलेले प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहेत…! 🌹



Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...