⚡ ब्रेकिंग News

रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडी विद्यालयात पाककृती स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न!* 🔥






 बिजवडी 

 प्रतिनिधी केशव जाधव (संपादक माणदेश न्यूज)

🏫*रयत शिक्षण संस्थेचे*

*कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडी*

ता. माण, जि. सातारा

🍲🔥*पाककृती स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न!* 🔥🍲

📅 सोमवार, दि. 16 मार्च 2026 रोजी सकाळी ठीक 8.00 वाजता विद्यालयामध्ये पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 5 वी ते 9 वी पर्यंतच्या मुला-मुलींनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

👩‍🍳👨‍🍳 विद्यार्थ्यांनी सकाळी आपापल्या चुली मांडून विविध राज्यांतील पाककृती तयार केल्या. चुलीवर स्वयंपाक करताना येणाऱ्या अडचणींवर मात करत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला. तसेच आई आपल्या कुटुंबासाठी किती कष्ट घेते याचीही जाणीव विद्यार्थ्यांना झाली.

🥘*विद्यार्थ्यांनी तयार केलेले काही पदार्थ:*

पुरणपोळी • थालीपीठ • बाजरी भाकरी-बेसन • ठेचा • इडली-सांबर • मसाला डोसा • चपाती-पनीर • भरलेले वांगे • कटलेट • पुरी-भाजी • खाकरा • बिट कटलेट • कांदा भजी • कोबी मंचुरियन • वांग्याचे भरीत तसेच

🍗 चिकन बिर्याणी • 🥚 अंडा बिर्याणी • चिकन दम बिर्याणी

🤝 या स्पर्धेमुळे एकमेकांना मदत करून काम कसे पूर्ण होते याचाही अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.

⏰ सकाळी 10.30 वाजता विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध पदार्थ आकर्षक पद्धतीने सजवून व्यासपीठावर मांडले.

🎖️ परीक्षणासाठी उपस्थित मान्यवर:

⭐ मा. श्री. हणमंतराव भोसले साहेब (जनरल बॉडी सदस्य)

⭐ HDFC बँक CSR अंतर्गत विद्यालयाला मदत करणारे मा. श्री. भट साहेब

⭐*विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र शिर्के सर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.*

👨‍🏫 मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पदार्थांची चव घेऊन व निरीक्षण करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच त्यांना आलेल्या अडचणींबाबत चर्चा करून त्यांचे अभिनंदन केले.

🏆 तयार केलेल्या पाककृतींमधून प्रथम पाच क्रमांक निवडण्यात आले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

🌟 विद्यालय नेहमीच विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व आत्मविश्वासाला प्रोत्साहन देत असते.

🙏 शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...