⚡ ब्रेकिंग News

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे कोरेगावात आयोजन

कोरेगाव प्रतिनिधी :दादा वाकडे 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत कोरेगाव येथे भव्य  शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार , दि. 8 मे 2026 सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.


महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा उद्देश नागरिकांना एकाच दिवशी विविध शासकीय सेवा देणे हा असून, “Single Day Service Delivery” या संकल्पनेतून सर्वसामान्यांना त्वरित सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

शिबिरात उपलब्ध होणाऱ्या प्रमुख सेवा:

विविध दाखले वाटप,

पीक विमा संबंधित मार्गदर्शन,

ई-पीक पाहणी,नोंदणी,

सामाजिक अर्थसहाय्य योजनांची माहिती व अंतर्गत पडताळणी

तक्रारींचे निवारण

७/१२ उताऱ्यावरील दुरुस्ती व फेरफार नोंदी,ST कार्ड,

प्रलंबित प्रकरणांचा निकाल,

लोकसेवा हक्क कायद्यानुसार तत्काळ सेवा,ज्येष्ठ नागरिकांना एसटी पास सुविधा उपलब्ध करून देणारे कार्ड.. तसेच महिलांसाठी मोफत  प्रवास कार्ड देण्यात येणार आहे,

हे फुलाई मंगल कार्यालय, एकांबे रोड कोरेगाव येथे पार पडणार असून कोरेगाव तालुका प्रशासन, महसूल विभाग व इतर शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या उपक्रमामुळे नागरिकांची शासकीय कार्यालयांमध्ये होणारी धावपळ कमी होणार असून अनेक कामे एकाच ठिकाणी व कमी वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

येताना बरोबर आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, रेशनिंगकार्ड ची झेरॉक्स व आयडी फोटो घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले आहे.


प्रमुख उपस्थिती - मा. डॉ. प्रियाताई महेश शिंदे (अध्यक्ष, सातारा जिल्हा परिषद),


मा. ना.श्री. महेश संभाजीराजे शिंदे-आमदार कोरेगाव.


श्री. संतोष पाटील जिल्हाधिकारी सातारा


मा. सौ. रूपाली शिवाजी गुरव,सभापती पंचायत समिती कोरेगाव



श्री. हणमंतराव जगदाळे सदस्य, सातारा जिल्हा परिषद.


सौ.राजेश्वरी दयानंद भोसले सदस्य, सातारा जिल्हा परिषद.


श्री .केतन अर्जुनराव चव्हाण सदस्य पंचायत समिती, कोरेगाव.


श्री. स्वाती संदीप जाधव ,सदस्य पंचायत समिती, कोरेगाव,


मा. सौ.दिपाली महेश बर्गे, नगराध्यक्ष, नगर पंचायत,कोरेगाव


श्री राहुल रघुनाथ बर्गे ,उपनगराध्यक्ष नगर पंचायत,कोरेगाव 


प्रमुख उपस्थिती 

श्री. सुनिता धिमते निवासी नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय,कोरेगाव


श्री. प्रमोद दत्तात्रय कुदळे उपविभागीय अधिकारी, कोरेगाव


श्री. डॉ. संगमेश प्रभाकर कोडे  तहसिलदार , कोरेगाव

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...