⚡ ब्रेकिंग News

लोणंदमध्ये वाहनांतून मावा विक्री पुन्हा जोमात; पोलिस कारवाईनंतरही परिस्थिती जैसे थे

दिलीप वाघमारे लोणंदमध्ये वाहनांतून मावा विक्री पुन्हा जोमात; पोलिस कारवाईनंतरही परिस्थिती जैसे थे लोणंद शहरात मावा (गुटख्याचा प्रकार) विक्रीचा बेकायदेशीर व्यवसाय पुन्हा एकदा उफाळून आला असून, दुचाकी व चारचाकी वाहनांमधून फिरून मावा विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. सुगंधित तंबाखूमध्ये सुपारीत पाणी टाकून तयार केलेला हा मावा शहरातील विविध भागांत खुलेआम विकला जात आहे. दोन दिवसांपूर्वी लोणंद पोलिसांकडून सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्या कारवाईनंतर काही वेळ शांतता असली तरी आता पुन्हा परिस्थिती “जैसे थे” झाल्याचे चित्र दिसून येत आहे. कारवाईचा धाक अल्पकाळापुरताच मर्यादित राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील गर्दीची ठिकाणे, गल्लीबोळ, बसस्थानक परिसर,नगरपंचायत परिसर, बाजारतळ परिसर तसेच तरुणांची वर्दळ असलेल्या भागांतून वाहनांमधून मावा विक्री केली जात आहे. पोलिसांची चाहूल लागताच विक्रेते ठिकाण बदलत आहेत तरुणाई या व्यसनाच्या विळख्यात अडकली जात असून मावा सेवनामुळे मुखाचा कर्करोग, दातांचे गंभीर आजार, पचनसंस्थेचे विकार होण्याची दाट शक्यता असते. विशेषतः शालेय व महाविद्यालयीन तरुण या घातक व्यसनाच्या आहारी जात असल्याने पालक व सुज्ञ नागरिकांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली आहे. नागरिकांकडून फिरत्या वाहनांवर विशेष पथक, अचानक तपासण्या, सीसीटीव्हीच्या मदतीने माहिती संकलन आणि वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर कडक व कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी होत आहे. केवळ एक-दोन दिवसांची कारवाई न करता सातत्यपूर्ण मोहिम राबवली, तरच लोणंद शहर मावा मुक्त होईल, असे नागरिकांचे मत आहे. लोणंद शहरात पुन्हा वाढलेल्या मावा विक्रीवर पोलीस प्रशासन ठोस पावले उचलणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...