कोरेगाव तालुका प्रतिनिधी.
कोरेगाव बाजारपेठ...
-पत्रकार दादा वाकडे.
कोरेगाव बाजारपेठेत मनमानी कारभार; अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी
कोरेगाव बाजारपेठ परिसरात नगरपंचायतीची अधिकृत परवानगी न घेता सार्वजनिक काम गटामार्फत खोदकाम सुरू असल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. या मनमानी कारभारामुळे सुमारे दोन ते चारशे घरांच्या सांडपाण्याचा निचरा पुण्यामध्ये अडथळा आणला जात असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
काही ठिकाणी गटारे तुटलेल्या अवस्थेत असून सांडपाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाली आहे. संबंधित वॉर्डमधील लोकांच्या मूलभूत गरजा आणि सोयींची कोणतीही चौकशी न करता काम सुरू करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
यासोबतच, संबंधित अधिकारी मुख्यालयात वास्तव्यास नसल्यामुळे प्रशासनावर नियंत्रण राहात नाही आणि अशा प्रकारच्या अनियमित कामांना खतपाणी मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे केवळ कंत्राटदारांवर नव्हे तर जबाबदार अधिकाऱ्यांवरही चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
नाल्याचे सांडपाणी योग्य पद्धतीने वाहून जाण्याची व्यवस्था करून, तुटलेली गटारे तातडीने दुरुस्त करण्यात यावीत. तसेच नाल्यामध्ये उभे करण्यात आलेले लाईटचे पोल त्वरित हलवून सुरक्षिततेची उपाययोजना करावी, अशीही नागरिकांची मागणी आहे.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
*माणदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा*

Post a Comment