कोरेगाव
प्रतिनिधी: दादा वाकडे
जय जय श्री कोरेगाव बाजारपेठ येथील रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील बाजारपेठेतील प्राचीन श्रीराम मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून भाविकांनी प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव साजरा केला.
शुक्रवारी दुपारी बरोबर १२ वाजता श्रीराम जन्माचा सोहळा मोठ्या उत्सवात पार पडला त्यामध्ये मंदिराचे सर्वासर्वे श्री.संजय मुरलीधळ बोकील यांनी सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य श्री सुनील काटकर तात्या या दोघांचे आभार मानून त्यांच्या वतीने श्री.श्रावण राजेंद्र जंगम यांचे प्रसाद श्रीफळ पेढा श्वाल देऊन सत्कार केला तसेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब यांनी नेहमीच आम्हाला सातारा कोरेगाव या दोन्ही ठिकाणी कायमच मदत केली असून कुटुंबातील सुखदुःखात नेहमीच आपल्या माध्यमातून विचारपूस केली जाते याचा मनाला कायमस्वरूपी आनंद होतो असे वक्तव्य केले त्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष सत्कार जरी आम्हाला करता आला नाही तर आम्ही त्यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपला सत्कार सन्मान करत आहोत हे सांगितले व रामनवमीच्या शुभेच्छा देखील दिल्या

Post a Comment