⚡ ब्रेकिंग News

डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून डॉलरमध्ये फसवणूक; साताऱ्यात बोगस कॉल सेंटरवर मध्यरात्री छापा, १७ आरोपी जेरबंद

 सातारा

 प्रतिनिधी :दादा वाकडे

अमेरिकन नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून डॉलरमध्ये फसवणूक; साताऱ्यात बोगस कॉल सेंटरवर मध्यरात्री छापा, १७ आरोपी जेरबंद*


*सातारा :* स्थानिक गुन्हे शाखा (LCB) सातारा यांनी मोठी कारवाई करत अमेरिकन नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. कोरेगाव-रहिमतपूर मार्गावरील सुभाषनगर येथील रिलायबल अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या 'श्रीसाई लॉजिस्टीक्स अँड कन्सल्टन्स एलएलपी' या कॉल सेंटरवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी १७ आरोपींना जेरबंद केले.

          पोलीस अधीक्षक सातारा निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी विशेष पथक तयार केले होते.

            माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे २३ मे रोजी पहाटे १२.५५ वाजता छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी अमेरिकन नागरिकांना 'तुम्ही ॲमेझॉनवर वस्तू ऑर्डर केली आहे' असे सांगून बनावट ऑर्डर क्रमांक पाठवत होते. ऑर्डर नाकारल्यास 'डिजिटल अरेस्ट' करण्याची भीती दाखवून गिफ्ट व्हाउचरद्वारे डॉलर स्वरूपात पैसे उकळले जात असल्याचे उघड झाले.

          या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


*अटक आरोपींची नावे :*


१) सागर हरिश्चंद्र सूर्यवंशी (वय ३३, मानखुर्द पश्चिम, मुंबई) – कॉल सेंटर मालक

२) विरेंद्र विनोद बोडरे (वय २७, गोवंडी, मुंबई)

३) अक्षय रामचंद्र भंडारी (वय २८, गौतमनगर, गोवंडी, मुंबई)

४) गुरुप्रसाद प्रताप राणे (वय ३१, उलवे, पनवेल, रायगड)

५) मनिष दिनेश जोशी (वय २८, सागवाडा, डुंगरपूर)

६) शमशुद्दीन सफाट सय्यद (वय ३८, ठाणे)

७) गौरव भानुदास लांडगे (वय २५, पाडळे, लोणंद, सातारा)

८) अभिषेक संजय गुप्ता (वय २३, तुर्भे गाव, नवी मुंबई)

९) इशांत संजय खांडेकर (वय २५, देवनार, चेंबूर, मुंबई)

१०) रितेश चंद्रेश चौहान (वय २६, नालासोपारा पूर्व, मुंबई)

११) बाबू व्यंकटेश चलवादी (वय २९, गोवंडी, मुंबई)

१२) अवि अजय वानखेडे (वय २४, तुर्भे नाका, नवी मुंबई)

१३) दिपक सुनिल खंडारे (वय २५, तुर्भे नाका, नवी मुंबई)

१४) मोहम्मद शफिक सलीम कोकणे (वय २८, गोवंडी, मुंबई)

१५) ओमकार संजय घार्गे (वय २४, घाटला, चेंबूर, मुंबई)

१६) दिपेन विवेक जाधव (वय २५, गोवंडी, मुंबई)

१७) लेबीन लारसन सायमन (वय २४, मालवणी चर्च कोळीवाडा, मालाड पश्चिम, मुंबई)



           सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, कोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे आणि पथकांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...