
निवेदन देताना शेतकरी नेते श्री धन्यकुमार जाधव
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी 23 मार्च 2026 रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन - शेतकरी संघटना नेते श्री धन्यकुमार जाधव (तात्या )
सातारा
केशव जाधव
संपादक माणदेश न्यूज
दिनांक अनेक सहकारी बँका, सहकारी पतसंस्था,सोसायटी, बुडाल्या सहकार खात्यातील अधिकारी फुकटचे पगार घेत आहेत, अनेक ठेवीदार बोंब मारून आत्महत्या करून मेले, सहकारी बँका, सोसायटी व पतसंस्थांच्या झालेल्या बेकायदेशी लिलावामुळे शेतकऱ्यानी आत्महत्या केल्या, सोसायटी सचिवांनी दुसऱ्याच्या नावावर कर्ज करून स्वतःच्या मालमत्ता वाढवल्या, सचिवांनी दुसऱ्याच्या नावावर कर्ज घेऊन ते कर्ज माफ करून घ्यायचे, मात्र गोरगरिबाच्या मिळकतीचे लिलाव काढायचे, सावकाराच्या कोट्यावधी रुपयाच्या मालमत्ता व प्रत्येक गावात शेतजमणी आहेत, गोरगरिबांच्या मिळकती बळकावलेल्या आहेत यासंबंधी नोटरी व्यवहाराबाबत चंद्रकांत देशमुखे यांच्या असंख्य तक्रारी आहेत,नोटरी व्यवहारावर मिळकती घशात घालण्याचे काम सुरू आहे, हे हजारो तक्रारी करून सहकार खाते दुर्लक्ष करीत आहे, पतसंस्था, बँका, सोसायटी यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार घोटाळे होत असताना, कोट्यावधी रुपये संगनमताने संचालक हडप करत असताना गोरगरिबांच्या मालमत्ता गिळकृत करत असताना, कोट्यावधी रुपयाचे भ्रष्टाचार सुरू असताना जिल्हा उपनिबंधक व सहकार आयुक्त कोणतीच कारवाई करीत नाहीत, या लोकांना त्या ठिकाणी जनतेच्या पैशाची लूट करण्यासाठी ठेवले आहे का? असा सवाल आहे? जिल्हा उपनिबंधक व सहकार आयुक्त यांना कारवाई करता येत नसेल तर त्यांना घरी पाठवावे, सहकार खात्याने ग्राहकांच्या ठेवीदारांच्या कर्जदारांच्या प्राप्त तक्रारी प्रमाणे सभासदांच्या प्राप्त तक्रारी प्रमाणे त्या संबंधित बँकेची, पतसंस्थेची, तात्काळ दहा दिवसात चौकशी केलीच पाहिजे, सोसायटीची चौकशी केलीच पाहिजे, सावकाराविरुद्ध प्राप्त तक्रारीप्रमाणे चौकशी करून गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजेत, असंख्य बँका, पतसंस्था बुडाल्या, सहकार खात्याने कोणतीच कारवाई केलेली दिसत नाही, तात्काळ सर्व बँका, पतसंस्था, क्रेडिट संस्था पतपेढी, यांचे प्राप्त तक्रार अर्ज प्रमाणे कारवाई करावी, सर्वच कर्ज प्रकरणाचे स्वतंत्र लेखा परीक्षण (टेस्ट ऑडिट ), चाचणी लेखापरीक्षण करून सहकार कायद्याचे कलम 83 व 88 नुसार तात्काळ विना विलंब सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करावे, जोशी लेखापरीक्षक अधिकारी कर्मचारी विरुद्ध देखील गुन्हे दाखल व्हावेत, नसेल तर हे आम्हाला जमणार नाही असे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिकनी सांगावे, पदमुक्त व्हावे, राजीनामा देऊन घरी बसावे, सहकार खात्यातील लोकांनी फुकटचे पगार खाऊ नये, जनतेच्या टॅक्स मधून तुमच्या पगारावर पैसे खर्च होतात, आपण पगार घेतो प्रामाणिकपणे कामे करा, तात्काळ सर्व बँका, पतसंस्थांचे कर्ज प्रकरण व तक्रारीप्रमाणे तात्काळ सर्व कर्जाचे स्वतंत्र लेखापरीक्षण टेस्ट ऑडिट न झाल्यास, सहकारी बँका पतसंस्था सोसायटीचे कलम 83 88 नुसार चौकशी न झाल्यास, गैर काम करणाऱ्या व बंद पडलेल्या संस्थावर कोणती कारवाई केली? व ठेवीदारांच्या ठेवी कधी मिळणार? हे जिल्हा उपनिबंधकनी जाहीर न केल्यास, कोणतेही बेकायदेशीर बोजा नोंदी करण्याचे प्रकार व बेकायदेशीर ताबा देण्याचे प्रकार, बेकायदेशीर जप्ती लिलाव कारवाई तात्काळ न थांबवले गेल्यास दिनांक 23 मार्च 2026 रोजी भव्य मोर्चा काढून जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे पाटील, शिवराष्ट्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांतजी पवार( भाऊ) शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष विजय पाटील, संघटनेचे कोरेगाव तालुका अध्यक्ष धन्यकुमार जाधव( तात्या) शेतकरी संघटना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हा संघटक अशोकराव पाटील, कराड तालुका अध्यक्ष विनायकराव जाधव, यांनी दिली आहे, तसेच सर्व तक्रारी व निवेदनावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे, या निवेदनावर असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत, दक्षिण अध्यक्ष संजय थोरात, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत देशमुखे, अपंगजनता दल जिल्हाध्यक्ष अस्लम आंबेकरी कालेकर, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र येळवे ( बापू ), उत्तम पोळ, महादेव देसाई, वसंतराव चव्हाण नाना, प्रशांत कदम, एम के बाबर भाऊ, लालासो पाटील, पांडुरंग पाटील नाना, फौजी बापू, बबन बाबर, सचिन कापूरकर, सदाशिव कार्वेकर कार्वेकर , शिवाजीराव कदम, प्रदीप फल्ले, इत्यादींनी दिलेल्या निवेदनात म्हटले असून त्या निवेदनावर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत, तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने केला असून हे व्यापक आंदोलन होणार असल्याचे सांगितले आहे.
Post a Comment