⚡ ब्रेकिंग News

सुभाषनगर विभागात रात्रगस्त वाढवण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर मधील नागरिकांच्या वतीने कोरेगाव पोलीस ठाण्याला निवेदन दिले.

 *सुभाषनगर विभागात रात्र गस्त वाढवा* 

_संभाजीनगर मधील नागरिकांचे पोलिसांना निवेदन_ 


*कोरेगाव 

तालुका प्रतिनिधी दादा वाकडे :

 वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सुभाष नगर विभागात कोरेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने रात्रगस्त वाढवावी अशी मागणी आज छत्रपती संभाजी नगर मधील नागरिकांनी पोलीस ठाण्याला केली आहे.

      याबाबत माहिती अशी की, शहरातील सर्वात मोठे उपनगर असलेल्या सुभाष नगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, आदर्श कॉलनी, साई कॉलनी, बर्गे कॉलनी,  अजिंक्य कॉलनी या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात रहिवास क्षेत्र वाढलेले आहे या भागातील लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरेगाव शहरातील नवीन प्रकल्प याच विभागात उभारले जात आहेत त्यामुळे या भागातील वर्दळ  मोठ्या प्रमाणात वाढली आहे, अशा या विस्तीर्ण उपनगरामध्ये गेल्या काही दिवसांपासून लहान मोठ्या चोरीच्या घटना वाढीस लागले आहेत. रात्री अपरात्री संशयित वाहनांची वर्दळही वाढली आहे यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली असून कोरेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने संपूर्ण सुभाष नगर विभागात रात्रगस्त वाढविण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर मधील रहिवासी तसेच महिला यांच्या वतीने कोरेगाव पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले, कोरेगाव पोलीस ठाण्याने या विभागात तातडीने रात्रगस्त वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

       निवेदन देताना संभाजीनगर गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रणव बर्गे, ज्येष्ठ नागरिक संघाचे संघटक विजयराव सपकाळ, सोनेरी ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे, शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख उल्काताई मालुसरे, भाजप महिला संघटिका मेघा वेल्हाळ, विकास वेल्हाळ आदींसह नागरिक यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...