दि. ४ जुलै | कोरेगाव प्रतिनिधी : दादा वाकडे
कोरेगाव शहरातील बाजारपेठेतील मुख्य रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे, पाण्याची डबकी आणि कचऱ्याचे ढीग साचत असल्याने परिसरात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे.
बाजारपेठेतील नागरिकांनी अनेक वेळा रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. मुख्य रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण का आहे? यंदा तरी या रस्त्यासाठी निधी मिळणार का? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
याप्रकरणी कोरेगाव नगरपंचायतीची भूमिका काय आहे, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व्यापारी, वाहनचालक, विद्यार्थी आणि पादचारी यांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी बाजारपेठेतील नागरिकांकडून होत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
— माणदेश न्यूज
संपादक : पत्रकार दादा वाकडे
Post a Comment