⚡ ब्रेकिंग News

कोरेगाव आझाद चौक या ठिकाणी ओबीसी समाजाचे आंदोलन

कोरेगाव 

प्रतिनिधी :दादा वाकडे 

सातारा जिल्हा ओ बी सी संघटनेचे अध्यक्ष श्री भरत लोकरे सर यांचे मार्गदर्शना खाली आज कोरेगाव मधे आझाद चौकामधे सर्व कोरेगांव तालुक्याच्या सर्व ओबीसी वर्गातील लोकांनी आंदोलन केले . आणि मंडल आयोगाच्या शिफारसी नुसार २७% टक्के आरक्षण सर्व बाबीमधे दिलेले आहे ' परंतू ते डावलून सातारा जि प अध्यक्षपद ओबीसी महिलेला राखीव असताना - ओपन मधून निवडून आलेली महिलेला अध्यक्षपदी बसवून संविधाना चा अपमान केला आहे .

राखीव मतदार संघातून निवडून आलेल्या ओरीजनल ओबीसी महिलेला हे पद मिळावे हे सामाजीक न्यायाला धरून होते . याचा निषेध करणेसाठी हे आंदोलन आहे .

असे ओबीसी चे प्रतिनिधी निवडून गेले नाही तर ओबीसीचे प्रश्न कोण मांडणार ? आरक्षणात चुकीच्या पळवाटा काढून आपणच सगळीकडे सत्ता भोगण्याच्या प्रवृत्तीला ठाम विरोध करण्यासाठी असे आंदोलन सर्व जिल्ह्यात सर्व तालुक्यात करणेत येणार आहे .त्याचा एक भाग म्हणून आजचे आंदोलन करणेत आले .


सदर आंदोलनाची माहितीचे पत्र तहसिलदार कोरेगांव यांनाही सादर करणेत आले . यासाठी श्री लोकरे सर चांचेसह गणेश कारंडे ,बाळासो काशीद ' संतोष मोरे , गणेश कारंडे , रामचंद्र माने ' सौ माणीक हजारे 'विजय मोरे खंडू माने ' हणमंत साळुंखे निवृत्तीनाथ सुतार यानी आंदोलनात भाग घेतला .

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...