⚡ ब्रेकिंग News

श्री गणेश मजूर संस्थेच्या दहिवडी फलटण महामार्गावरील नवीन खरेदी केलेल्या वास्तूचा उद्घाटन सोहळा संपन्न

 बिजवडी 

दिनांक:१९ मार्च २०२६

प्रतिनिधी केशव जाधव (संपादक माणदेश न्यूज)

आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मौजे बिजवडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी अहमदनगर सांगली या राष्ट्रीय महामार्गावर जाधववाडी गावचे माजी सरपंच, गणेश मजूर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व चेअरमन व माझी चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी जाधववाडी श्री दौलतराव बाबासो जाधव श्री गणेश मजूर संस्थेच्या नवीन खरेदी केलेल्या वास्तूचे विधीवत उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्यासाठी जाधवाडी गावचे मिस्टर सरपंच श्री विकास निंबाळकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन श्री तुकाराम जगन्नाथ भोसले तसेच जेष्ठ पत्रकार बापूराव गुंजवटे बिजवडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री शंकर शेठ जाधव श्री हनुमंत जगन्नाथ भोसले श्री बाबासो चव्हाण जाधवाडी गावचे माजी सरपंच श्री आप्पासो दौलत निंबाळकर ह .भ.प. निलेश महाराज निंबाळकर भारतीय जनता पार्टीचे जाधव वाडीतील युवा नेते शरद भैय्या जाधव जाधववाडीतील प्रतिष्ठित नागरिक श्री अण्णा गुलाबराव जाधव सर बिजवडी गावातील प्रसिद्ध व्यापारी श्री राजेंद्र दादासो भोसले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख श्री केशव शिवाजीराव जाधव जाधव वाडीतील प्रतिष्ठित नागरिक श्री लक्ष्मणराव जाधव श्री बाळासो रघुनाथ भोसले भारतीय जनता पार्टीचे नेते श्री शिवाजीराव पोपट निंबाळकर बिजवडी विकास सेवा सोसायटीचे सेक्रेटरी श्री विकी भोसले प्रशांत शेठ वीरकर श्री बाळासो भोसले श्री देवबा एकनाथ निंबाळकर सचिन जाधव श्री मल्हारी आबा जाधव श्री पोपट नाना जाधव बिजवडी विद्यालयाचे कर्मचारी श्री विठ्ठल भोसले जाधववाडी गावचे प्रतिष्ठित नागरिक व भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री अमोल शठ देवबा निंबाळकर यांच्यासह विविध सामाजिक राजकीय सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

      यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री दौलतराव बाबासो जाधव व त्यांच्या श्री गणेश मजूर संस्थेस शुभेच्छा दिल्या व जाधव परिवाराचे अभिनंदन केले यावेळी जाधव परिवारातील प्रसिद्ध बागायतदार व यशस्वी डेरी उद्योजक श्री आत्माराम शेठ बाबासो जाधव अक्षय आत्माराम जाधव व त्यांचा परिवार उपस्थित होता.


Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...