बिजवडी
केशव जाधव संपाद माणदेश न्यूज
७ लाख ५१ हजार ५२३ शेतकरी आहेत. त्यापैकी ४ लाख ९९ हजार ४९२ शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक अॅपमध्ये नोंदणी केली आहे. म्हणजेच सुमारे ६६ टक्के शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. मात्र अजूनही २ लाख ५२ हजार ९८८ शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक अॅपमध्ये नोंदणी केलेली नाही.
अॅग्रीस्टॅक नोंदणी न केल्यास या शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. आधार व फार्मर आयडी नोंदणीतील त्रुटी, अपुरी कागदपत्रे आणि प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यामुळे अनेक पात्र शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या जिल्ह्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा तपशील गोळा करण्याचे काम सुरू असून सेवा सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत ही माहिती शासनाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड केली जात आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी अजूनही आधारकार्ड, अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे संस्थांकडे जमा केलेली नाहीत.
माहिती अपूर्ण राहिल्यास शासनाच्या पोर्टलवर कर्जमाफीची नोंदणी होऊ शकणार नाही. त्यामुळे ज्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी अद्याप अॅग्रीस्टॅक अॅपमध्ये नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने सेवा सहकारी संस्था किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेशी संपर्क साधून नोंदणी पूर्ण करावी.
शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा भविष्यातील कर्जमाफी किंवा सहाय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

Post a Comment