⚡ ब्रेकिंग News

आम आदमी पार्टीची महाराष्ट्र राज्यस्तरीय आढावा व नियोजन बैठक पुण्यात पार पडली.

 पुणे

केशव जाधव (संपादक माणदेश न्यूज)

आम आदमी पार्टीची महाराष्ट्र राज्यस्तरीय आढावा व नियोजन बैठक पुण्यात पार पडली. ही बैठक महाराष्ट्र प्रदेश प्रभारी Prakash Jarwal (प्रकाश जरवाल) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्यातील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढलेले उमेदवार उपस्थित होते.*

*यावेळी सातारा जिल्हा उपाध्यक्ष सोहम शिर्के यांनी कार्यकर्त्यांवर होत असलेल्या खोट्या गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी वकिलांची फौज उभी करण्याचे आवाहन केले. तसेच SBDB या उपक्रमातून माण-खटावपासून ग्रामीण भागात डिजिटल क्रांती, रोजगारनिर्मिती, महिला सशक्तीकरण आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी काम सुरू होणार असल्याची माहिती दिली.*

*बैठकीत Prakash Jarwal यांनी लवकरच दिल्लीतील प्रमुख नेते महाराष्ट्रात सभा घेऊन पक्षविस्ताराला गती देणार असल्याचे सांगितले. तसेच माण-खटाव आणि सातारा जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यावर विशेष लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.*🚩🚩🚩🚩






Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...