मंत्रालय, मुंबई
प्रतिनिधी संपादक केशव जाधव
| दि. १७ मार्च २०२६
भटकंती करणाऱ्या मेंढपाळ धनगर बांधवांच्या उपजीविकेला अधिक स्थैर्य मिळावं, त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड मिळावी, या दृष्टीनं आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत अर्धबंधिस्त मेंढीपालन प्रकल्प समाविष्ट करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. भटकंती करणाऱ्या मेंढपाळांना स्थिर उत्पन्न मिळावं, त्यांच्या कळपाची योग्य निगा राखता यावी आणि उत्पादनक्षमता वाढावी, यासाठी हा प्रकल्प कसा प्रभावीपणे राबवता येईल, याची माहिती घेतली.
या प्रकल्पामुळं धनगर समाजातील बांधवांना आधुनिक पद्धतीनं मेंढीपालन करता येईल, खर्चात बचत होईल आणि उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास आहे.
यावेळी प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव संतोष कराड, उपसचिव अंबादास चंदनशिवे, कृषी संचालक सुनिल बोरकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.शितलकुमार मुकणे, मेंढपाळ धनगर विकास मंचाचे अध्यक्ष श्री.संतोषजी महात्मे तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनातून आणि सूचनांमधून या योजनेला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे.
आपल्या मेंढपाळ बांधवांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, आणि त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा योजनांचा निश्चितच उपयोग होईल.



Post a Comment