⚡ ब्रेकिंग News

कोरेगाव शहरात सोनेरीने महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण केले : प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ फत्तेसिंह बर्गे

 दिनांक २२मार्च 

 प्रतिनिधी: दादा वाकडे

विविध समाजोपयोगी विधायक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत कोरेगाव शहरात महिलांसाठी स्वतंत्र हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम सोनेरी सखी मंचने केले असल्याचे प्रतिपादन कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष, हॉटेल दरबार समूहाचे प्रमुख राजाभाऊ फत्तेसिंह बर्गे यांनी व्यक्त केले. 

       जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोरेगाव शहरातील सोनेरी सखी मंचने रोटरी उद्यान येथे आयोजित केलेल्या महिलांसाठीच्या महाराष्ट्राची लोकगाथा या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी श्री. बर्गे बोलत होते. 

      व्यासपीठावर कोरेगावच्या नगराध्यक्ष सौ. दिपालीताई महेश बर्गे, नगरसेविका सौ. वनमाला बर्गे, उद्योजक धीरज संजय बर्गे, लोकसेवक डॉक्टर विघ्नेश प्रदीप बर्गे, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोरेगाव तालुका अध्यक्ष डॉ. सौ. संगीता रणजितसिंह सावंत, सोनेरी ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे उपाध्यक्ष अजित विलासराव बर्गे आदींची उपस्थिती होती.

     यावेळी बोलताना राजाभाऊ बर्गे म्हणाले, कोरेगाव शहराला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे हा वारसा जतन करण्याचं काम अशा विविध उपक्रमातून होत असते महिलांसाठी आयोजित केलेल्या या अतिभव्य कार्यक्रमाने कोरेगावच्या सांस्कृतिक वैभवात निश्चितच भर पडणार आहे. सोनेरीच्या अशा विधायक उपक्रमांना आमचे नेहमी सहयोग राहील असेही ते म्हणाले. 

यावेळी बोलताना नगराध्यक्ष सौ. दिपालीताई महेश बर्गे यांनी नव्या कलाकारांच्या संचासह सलोनी आडेकर यांनी उभा केलेला हा सांस्कृतिक जलसा निश्चितच प्रेरणादायी असल्याचे सांगीतले.

       प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनेरी सखी मंच अध्यक्ष सौ. धनश्री अजित बर्गे यांनी केले. तर स्वागत उपाध्यक्ष दीपावली प्रशांत पाटील, सेक्रेटरी ॲड. शुभांगी रोहिदास बर्गे, ट्रेझरर स्वाती नितीन बर्गे, शितल मिलिंद बर्गे, उमा संतोष नलावडे यांनी केले.

        यावेळी सलोनी आडेकर व त्यांच्या सहकलाकारांनी सांस्कृतिक जलसा असलेल्या महाराष्ट्राची लोकगाथा हा कार्यक्रम सादर केला. अनेक प्रकारची पारंपारिक वाद्य, लोकसंगीत, लोकगीत, पोवाडा, भारुड, भक्ती संगीत, गोंधळ गीते सादर करून उपस्थित हजारो महिलांना ताल धरायला लावला. 

      या कार्यक्रमास कोरेगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समिती सभापती स्नेहल आवटे, नगरसेविका संजीवनी बर्गे, नगरसेविका संगीता ओसवाल, उल्का मालुसरे, इनरव्हीलच्या अध्यक्ष संजीवनी मोरे आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. शितल मिलिंद बर्गे, सौ. प्रियांका सागर जाधव, सौ. वर्षा सोमनाथ बर्गे, सौ. स्वरा अमित बर्गे, सौ. स्वप्नाली वैभव गवळी, सौ. सुनंदा संजय बर्गे, सौ. पल्लवी हिंदुराव काटे, सौ. सुप्रिया अमर देशमुख, सौ. रेश्मा रवींद्र जाधव, सौ. गौरी वैभव बर्गे, सौ. संगीता दीपक बर्गे, सौ. काजल विघ्नेश्व बर्गे, सौ. सुजाता संतोष वाकडे, सौ. सोनाली धनंजय भुजबळ, सौ. प्राजक्ता अभिजीत बर्गे, सौ उज्वला अशोक भोसले, सौ. अर्चना पृथ्वीराज बर्गे, सौ. संगीता राजेश बर्गे, सौ शितल सचिन सावंत यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ: सांस्कृतिक कार्यक्रमाचे शुभारंभ प्रसंगी राजाभाऊ बर्गे, दिपालीताई बर्गे, वनमाला बर्गे, धीरज बर्गे, डॉ. संगीता सावंत, धनश्री बर्गे आदी.

कोरेगाव शहरात सोनेरीने महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण केले : प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ फत्तेसिंह बर्गे* 

 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क पत्रकार दादा वाकडे संपर्क:9096659088

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...