⚡ ब्रेकिंग News

हनुमान जयंतीनिमित्त कोरेगावातील हनुमान घाट मारुती मंदिरात श्रावणभैय्या जंगम मित्र परिवाराचे दर्शन

 कोरेगाव

प्रतिनिधी: दादा वाकडे 


हनुमान जयंतीच्या निमित्ताने कोरेगाव शहरातील हनुमान घाटावरील सुप्रसिद्ध मारुती मंदिरात श्रावणभैय्या जंगम मित्र परिवाराने मारुतीरायाचे दर्शन घेतले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्रावणभैय्या जंगम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना श्रावणभैय्या जंगम यांनी हनुमान घाटावरील मारुती मंदिराचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, हे मंदिर अनेक वर्षांपासून नागरिकांच्या नवसाला पावणारे असून त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारे श्रद्धास्थान आहे. अनेक शतकांपासून हा मारुती घाटावरील नागरिकांचे रक्षण करत उभा आहे. पंचक्रोशीत मारुतीच्या नावावरून ओळखले जाणारे हे एकमेव मंदिर असून या भागाला ‘हनुमान घाट’ म्हणून ओळख मिळाली आहे.

तसेच, जुन्या काळात हनुमान घाट गणेश उत्सव मंडळ विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रसिद्ध होते. तालुकाभरातून नागरिक येथे गणेशोत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येत असत, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी श्रावणभैय्या जंगम मित्र परिवाराने हनुमान जयंती निमित्त बाजारपेठ कोरेगाव या ठिकाणी भक्तांना प्रसादाचे वाटप केले. या प्रसंगी हनुमान घाट मंडळाचे अध्यक्ष संतोषजी गोरे, खजिनदार ऋषिकेशजी गोरे, गौरवजी घाडगे, तेजसजी बर्गे (नंदू), संतोषजी बर्गे, चंद्रकांत (काका) बर्गे, यश बर्गे, शिवराज बर्गे, अतुलजी जंगम, सागरजी बल्लाळ, अभीजीत मुळे, स्मित बल्लाळ, शुभम सुतार, पंकज मुळे, ऋषी भैय्या कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते. हनुमान जयंतीनिमित्त मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली असून भक्तिमय वातावरणात हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.


“हनुमान जयंती हा आमच्यासाठी श्रद्धेचा आणि ऊर्जा देणारा दिवस आहे. समाजात सकारात्मकता व एकात्मता निर्माण व्हावी, हीच मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना.”

— श्रावणभैय्या जंगम

 महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा 

 संयोजक लोकसभा सातारा युवा मोर्चा

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...