⚡ ब्रेकिंग News

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत सातारा जिल्ह्यातील ब वर्ग यात्रास्थळांवर विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

 


सातारा 

प्रतिनिधी केशव जाधव 

सोळा शिवलिंग, शैनेश्वर देवस्थान, सोळशी तालुका, कोरेगाव, जिल्हा सातारा येथे विकासकामांसाठी २ कोटी ९९ लाख ८८ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच खटाव तालुक्यातील श्री क्षेत्र गिरिजाशंकर देवस्थान, गिरजाशंकरवाडी (राजाचे कुर्ले) येथे विकासकामांसाठी ५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.


या दोन्ही देवस्थानच्या विविध विकासकामांसाठी मंजूर केलेल्या निधीतून या देवस्थान परिसरातील होणाऱ्या विकास कामांमुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना अधिक सुविधा मिळणार असून दर्शनाचा अनुभव अधिक सुकर होईल.


Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...