⚡ ब्रेकिंग News

गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांचा गौरवपूर्ण सत्कार


प्रतिनिधी महेंद्र भोसले 

पंचायत समिती माणचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांची शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाच्या अभ्यासगट प्रमुख पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा दहिवडी येथील शाळा क्रमांक १ मध्ये गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढीसाठी तसेच शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. “गुणवंत अधिकारी सत्कार” कार्यक्रमात श्री.महालक्ष्मी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दुर्योधन पाटील सर(उपसरपंच ग्रामपंचायत फडतरी )पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या माधुरी भोसले-सावंत, योगेश सावंत, श्री महालक्ष्मी कॉलेजचे ग्रंथपाल सुनील चव्हाण सर यांच्या हस्ते पिसे यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आयोजकांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या खऱ्या कार्याची पोहच म्हणून हा पुरस्कार देण्यात येतो. त्यांनी शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी घेतलेले पुढाकार, शिक्षकांना दिलेले मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न यामुळे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. प्रभावी नेतृत्वामुळे व मार्गदर्शनामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडत असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण अध्यापन व्हावे तसेच शैक्षणिक उपक्रमांना चालना मिळावी. यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले . त्यांच्या कार्यामुळे अनेक शाळांना दिशा मिळाली असून शिक्षकांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे . कार्यक्रमास शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच शिक्षक प्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या या सन्मानाबद्दल आयोजकांचे आभार मानत भविष्यात ही शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला . महालक्ष्मी ज्युनि, कॉलेज मोही प्राचार्य दुर्योधन पाटील , मोहे कॉलेजच्या ग्रंथपाल सुनील चव्हाण, माधुरी भोसले - सावंत व योगेश सावंत यांच्या हस्ते गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...