कोरेगाव
प्रतिनिधी : दादा वाकडे
कोरेगाव येथील साई कॉलनीयेथील नागरिक समस्या सोडवण्यासाठी तत्पर हजर माणदेश न्यूज
कोरेगाव मधील जुने पेठ काटे वस्ती मॉडर्न शाळा डी पी भोसले कॉलेज रहिमतपूर रोड येथील काटे वस्ती येथे अंडरग्राउंड लेंडूरीचे काम चालले असून येथील दहा पंधरा घरे रहिवासी असून येथे पुलाचे काम बरेच दिवस चालू असून लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ता नाही
लोकांची गैरसोय होत आहे कचरा घंटागाडी गॅस गाडी व येण्या जाण्यासाठी गैरसोय होत आहे तरी नगरपंचायतीला व संबंधित ठेकेदाराला वारंवार सांगून सुद्धा अजून दखल घेतली जात नाही नगरपंचायतीचे इंजिनीयर यांना वारंवार सांगून याच्यावर तोडगा काढा तरी याच्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत
पुलावरती जाण्या येण्यासाठी काहीतरी व्यवस्था लवकरात लवकर करावी अशी नागरिकांची मागणी आहे
व नागरिकांची गैरसोय लवकरात लवकर दूर करावी अशी अशा व्यक्त करत आहेत कोरेगाव ची यात्रा जवळ आली असून रस्त्याचे काम जाणे येण्यासाठी लवकर पूर्ण करण्यात यावे नागरिकांची गैरसोय दूर करावी

Post a Comment