*भाटकी येथील शासकीय नालाबिल्डिंग तोडफोड* *प्रकरणासंदर्भात तसेच माण-खटाव तालुक्यातील जलसंधारण, पाणी, शेती व इतर मूलभूत प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.*
*👉 आज महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्ता भरणे (मामा) यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.*
*सदर प्रकरण मागील 1.5 वर्षांपासून प्रलंबित असून तहसीलदारांचे स्पष्ट आदेश असूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.*
*👉 “माण-खटाव वाचवा – जलसंधारण वाचवा” हा मुद्दा ठामपणे मांडण्यात आला.*
*तसेच नालाबिल्डिंग ही शासकीय जलसंधारण रचना असून तिची तोडफोड ही बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करण्यात आले.*
*👉 कृषिमंत्री यांनी एक-दोन दिवसांत संपूर्ण माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून पुढील ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.*
*तसेच त्यांनी “उपोषण करू नका… आम्ही नक्कीच मार्ग काढू” असेही सांगितले.*
*👉 मात्र, माण-खटावच्या जनतेच्या व शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आम्ही ठाम आहोत:*
*📢 दि. 30 एप्रिल 2026 पर्यंत ठोस मार्ग न निघाल्यास दि. 01 मे 2026 पासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल.*
*👉 माण-खटाव हा दुष्काळी भाग असून येथे असलेले तलाव, नालाबांध व जलसंधारणाची कामे हीच शेतीची जीवनरेखा आहेत. या रचनांची तोडफोड झाली तर संपूर्ण भाग गंभीर संकटात जाईल.*
*👉 हा लढा केवळ एका नालाबिल्डिंगपुरता मर्यादित नसून माण-खटावच्या पाणी, शेती व भविष्यासाठी आहे.*
*✊ “माण-खटाव वाचवा – हक्कासाठी लढा” 💧*
*– सोहम शिर्के*
*सामाजिक कार्यकर्ता व आंदोलक*
*जिल्हाउपाध्यक्ष व प्रवक्ता, आम आदमी पार्टी, सातारा*
💐💐💐✌️✌️🤝🤝🤝



Post a Comment