⚡ ब्रेकिंग News

ठाणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद कणसे यांचा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या हस्ते सत्कार; सातारा जिल्ह्यात शिवसेनेची बांधणी मजबूत करण्याचा निर्धार

नगरसेवक शरद कणसे यांचा सत्कार करताना प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे आणि संदीप केंजळे.


ठाणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद कणसे यांचा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या

हस्ते सत्कार; सातारा जिल्ह्यात शिवसेनेची बांधणी मजबूत करण्याचा निर्धार

कोरेगाव : ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल शिवसेना सातारा जिल्हा संपर्कप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक शरद कणसे यांचा कोरेगावचे नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी भेट घेऊन सत्कार केला व पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कठापूर येथील ज्येष्ठ नेते संदीप केंजळे उपस्थित होते.
या भेटीदरम्यान सातारा जिल्ह्यात शिवसेनेच्या माध्यमातून भरीव विकासकामे करण्याबाबत तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात जिल्ह्यातील विविध भागात शिवसेनेचे कार्य अधिक प्रभावीपणे वाढविण्यासाठी नियोजन करण्याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक संवाद झाला.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित नगरसेवक शरद कणसे यांनी सांगितले की, कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अंगापूर वंदन हे गाव माझी मातृभूमी असून सातारा जिल्ह्याशी माझे घट्ट नाते आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच पर्यटनमंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शिवसेनेच्या माध्यमातून करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्याने त्यांना आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवायचा आहे. त्या दृष्टीने सर्वांनी शिवसेनेला ताकद द्यावी. शिवसेना पक्ष हा नेहमीच सामान्य शिवसैनिकाच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाहीही कणसे यांनी यावेळी दिली.
यावेळी कोरेगाव शहर, तालुका आणि संपूर्ण विधानसभा मतदारसंघात गाव पातळीपासून ते तालुका पातळीपर्यंत शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याबाबत कणसे यांनी प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. लवकरच कोरेगाव शहराला भेट देऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...