⚡ ब्रेकिंग News

लोककल्यानाचे कार्य करणाऱ्या महामानवांना इथल्या व्यवस्थने जाती जातीत बंदिस्त केले - बाळासाहेब रणपिसे

दहिवडी

प्रतिनिधी:महेंद्र भोसले

 लोककल्यानाचे कार्य करणाऱ्या महामानवांना इथल्या व्यवस्थने जाती जातीत बंदिस्त केले - बाळासाहेब रणपिसे 

संपूर्ण मानवजातीच्या कल्यानासाठी व विकासासाठी ज्या महामानवांनी आपले आयुष्य वेचले त्यांना इथल्या व्यवस्थेने जाती जाती मध्ये बंदिस्त केले त्यामुळे त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचू शकले नाहीत परिणामी समाजामध्ये देवभोळेपणा व अंधश्रद्धा वाढिस लागली 


असे प्रतिपादन माण पंचायत समितीचे माजी सभापती व समय फॉउंडेशन चे अध्यक्ष बाळासाहेब रणपिसे यांनी केले ते औदयोगिक प्रशिक्षण संस्था दहिवडी यांनी आयोजित केलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य गावडे सर होते 

रणपिसे पुढे म्हणाले की समाजाच्या या अज्ञानामुळे आसाराम बापू,अशोक खरात सारखे भोंदू बुवा महिला व मुलिंचे लैंगिक शोषण करीत आहेत,समाजामध्ये जातीय व धार्मिक दंगे होत आहेत,कुटुंबे उध्वस्थ होत आहेत व तरुण पिढी बरबाद होत आहे त्यासाठी विदयार्थ्यांनी महामानवांच्या विचाराचे वाचन करावे,अनुकरण करावे असे आवाहन करून छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,नरवीर उमाजी नाईक यांच्या कार्याची थोडक्यात माहिती देऊन व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाच्या काळातील दोमोदर व्हॅली,हिराकूड धरण,विजप्रकल्प,कामगार कायदे,नदीजोड प्रकल्प, ई कार्याची माहिती दिली.यावेळी महिला अधिकार परिषदेच्या अध्यक्षा भारती पवार,प्राचार्य ओंबासे सर यांनी मनोगत व्यक्त केले.आय टी आय कॉलेजचे पाटील सर यांनी प्रस्ताविक केले,उबाळे सर यांनी आभार मानले 

कार्यक्रमास समय फॉउंडेशन च्या मिनाज शेख,कॉलेज व्यवस्थान समितीचे शासकीय सदस्य गोविंदराव आवटे सर्व प्राध्यापक,विध्यार्थी व विध्यार्थिनी उपस्थिती होते

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...