⚡ ब्रेकिंग News

हरिष ॲन्ड सन्स ' गॅस एजन्सी मधे सावळा गोंधळ

कोरेगाव 

 प्रतिनिधी: दादा वाकडे

 गॅसची टंचाई आहे पण ३० मार्चला सिलेंडर तुमच्याकडे डिलीव्हर झाला म्हणून ग्राहकाला msg आला म्हणून ग्राहकाने online पेमेंटही केले तरी आजअखेर सिलेंडर मिळाला नाही ,मग तो दिला कुणाला ?


यासाठी गेले १० दिवस रोज गॅसच्या ऑफीसला जावून येण्याचा रतीब त्यांनी लावला आहे .पण रोज तिच उत्तरं मिळत आहेत .


 ऑफीसमधे म्हणतात गो डावूनला जा । गोडावून मधे म्हणतात ऑफीसला जा ।

श्री गालींदे हजर नाहीत त्यांचा फोन नंबर देत नाहीत .

आम्ही नेमके कुणाकडे जायचे? असे ग्राहक तक्रार करीत आहेत .

तहसिलदार कार्यालयात जावून त्यांनाही व्यथा सांगितली .

आता बघू काय होतय?

सर्व रामभरोसे आहे .

कुणीच तारणहार नाही .

अशा अनेक ग्राहकांच्या वेदना आहेत .


ग्राहकाने नंबर लावून - त्याचा मेसेज येवून - ऑनलाईन पैसे भरून ही सिलेंडर मिळत नाही .



आज म्हणले गाडी आली नाही .

मग ३० मार्च पासून गाडी आलीच नाही का ?

असे प्रश्न सामान्य ग्राहकाला पडत आहेत . वेळोवेळी

शासनाच्या याबाबत काय सूचना आहेत हे पण ऑफीसमधे सकृतदर्शनी लावायला पाहिजे अशा तक्रारी ग्राहक करत आहेत .

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...