⚡ ब्रेकिंग News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती विविध उपक्रमांनी कोरेगाव व सातारा शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.

दिनांक१४ एप्रिल

कोरेगाव प्रतिनिधी 

 दादा वाकडे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व परिवर्तन विचार मंच, किंग मेकर ग्रुप कोरेगाव तालुक्याच्या वतीने महान थोर महात्मा जोतिबाराव फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती विविध उपक्रमांनी कोरेगाव व सातारा शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाची सुरुवात मध्यरात्री १२ वाजता जुना मोटार स्टँड येथे महामानाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आतषबाजी करण्यात आली. यानंतर दुपारी १२ वाजता डॉ. आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबाराव फुले यांच्या कार्यावर भाष्य केले. 

त्यानंतर प्रमुख पाहुणे पोलीस उपअधीक्षक राजेश्री तेरणी मॅडम, कोरेगाव पोलिस निरीक्षक बल्लार साहेब, ज्येष्ठ पत्रकार, श्रीमंत भंडारे साहेब,

जि. नियोजन स अध्यक्ष राहुल दादा बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल दादा बर्गे, नगर सेवक प्रीतम भैय्या बर्गे, मा.ग्रामपंचायत सदस्य प्रदीप बोतालजी, खादीग्राम उद्योग अध्यक्ष जालिंदर    

बोतालजी, नगरसेवक सुनील दादा बर्गे, नगरसेव संतोष काका बर्गे, नगरसेवक साई बर्गे, संभाजी ब्रिगेडचे पांडुरंग पवार साहेब, डेरे वकील, वैभव रणखांबे,

समाधान शेडगे, राजू शिंदे , संभाजी ब्रिगेडचे तालुका संपर्क प्रमुख वैभव जगदाळे, अमोल भूतकर वकील इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्यावेळी त्यांनी आप आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी पत्रकार, शिक्षक, प्राध्यापक, अधिकारी, पोलीस कर्मचारी व विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. आदिश पाटील व डॉक्टर टीकुळे साहेब 

यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोरेगाव शहरातील जिल्हा प्राथमिक शाळांतील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले, 

माऊली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोरेगाव यांच्यामार्फत

शालेय विद्यार्थी, कुमारवयीन मुली यांची आरोग्य तपासणी तथा रक्त गट तपासणी शिबिर करण्यात आली प्रतिसात चांगल्या प्रकारे मिळाला,

तपासणी शिबिरातील गरजू रुग्णास आवश्यक असल्यास (शस्त्रक्रिया) मोफत करण्यात येणार,

शस्त्रक्रिया- हरनीया, अपेंडिक्स, अंडाशय विकार, मूत्रमार्गेचे विकार इ शस्त्रक्रिया 14 वयवर्ष च्या आतील मुला मुलींची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार..

महागाव सातारा या ठिकाणी वृद्ध आश्रम याठिकाणी अन्नदान करण्यात आले....

कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष नितीन भाऊ बोतालजी, मनिषा ताई सोनवणे,

युवक अध्यक्ष ऋतुराज वायदंडे, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण माने, किंग मेकर ग्रुप कोरेगाव चे अध्यक्ष आकाश येवले, निखिल गायकवाड, समीर शिखरे, रोहित बुधवले, अण्णा भाऊ साठे नगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील भैय्या बोतालजी, सामाजिक कार्यकर्ता निलेश बोतालजी, 

अंकुश अडागळे, 

अभिजीत बोतालजी, मनोज बोतालजी, शुभम सुतार, मदन सुतार, विशाल रणखांबे, रंजना बोतालजी, सुवर्णा बोभाटे, तेजस्विनी अडागळे, स्नेहल सोनवणे, मेघा सोनवणे, तेजस्विनी बोतालजी,

अन्य कार्यकर्ते उपस्थित सहभागी होते,


कार्यक्रमाच्या शेवटी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष मनीषाताई सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले. ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत भंडारे

यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याची घोषणा केली.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...