⚡ ब्रेकिंग News

*शेतकरी वाचवण्यासाठी कर्जमाफी काळाची गरज*

 राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज असुन शेतकरी कर्जमाफी करताना थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसह नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा या मागणीसाठी आज माननीय मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार व शेतकरी कर्जमाफी समितीचे अध्यक्ष मा.श्री. प्रविणजी परदेशी साहेब यांना निवेदन दिले.


राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी अभ्यास समिती नेमली असुन, समितीच्या अहवालानुसार पुढील निर्णय होणार आहे. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालाच पाहिजे परंतु अत्यंत कठीण परिस्थितीतही वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळत नाही त्यामुळे त्यांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण होत आहे. त्याचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. 


म्हणून शासनाच्या धोरणानुसार जेवढी कर्जमाफी थकीत कर्जदार शेतकऱ्यांना होईल तेवढेच प्रोत्साहनपर अनुदान नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात यावे. अशी स्पष्ट नोंद शासनाला देण्यात येणाऱ्या अहवालात करण्यात यावी, अशी मागणी सदर निवेदनाद्वारे मा.श्री. प्रविणजी परदेशी साहेब यांच्याकडे केली आहे.

#शेतकरी_कर्जमाफी #प्रोत्साहनपर_अनुदान #AshutoshKale #Kopargaon

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...